Tuesday, 22 January 2019

नालासोपारा आणि वसई रेल्वे ट्रॅक दरम्यान “खुनी खंबा”

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, विरार

 

मुंबईची लाइफलाईन असलेली लोकल दिवसेंदिवस अनेकांच्या मृत्यूची डेडलाईन बनत आहे. रेल्वेच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक प्रवाशांचा बळी जात आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूमागे लोकलमधील गर्दीसह अनेक तांत्रिक कारणे देखील आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा आणि वसई रेल्वे ट्रॅक दरम्यानचा ‘तो’ खांब “खुनी खंबा” ठरत आहे.

 

नालासोपारा आणि वसईच्या दरम्यान एकाच ठिकाणी रेल्वेरुळालगत असलेल्या विद्युत खांबाजवळ कित्येक दिवस सतत अपघात घडत आहेत.

 

गेल्या वर्षभरात प्रत्येक महिन्यात 20 ते 25 जणांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. आज पुन्हा एकदा असाच एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

आज सकाळी 8च्या सुमारास विद्युत खांबाजवळ 25 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 40 ते 45 मिनिटांनंतर या मृतदेहाची दखल घेण्यात आली.   

 

2016 ते  आतापर्यंत तब्बल 376 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 209 पुरुष तर 167 महिलांचा समावेश आहे . 

 

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य