Sunday, 18 November 2018

‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोंढाणे धरण घोटाळ्याप्रकरणी तीन हजार पानांचं आरोपपत्र ठाणे कोर्टात दाखल करण्यात आले आहे. पण तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांचं नाव मात्र या आरोपपत्रामध्ये नाही.

 

एवढंच नाही तर त्यांची चौकशी होणार की नाही हेदेखील स्पष्ट नाही. या आरोपपत्रात तटकरेंची चौकशी करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली.

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही मागणी केली. यात एफ.ए. कन्सट्रक्शनचे निसार खत्री यांच्यासह बांधकाम विभागाच्या 6 अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले.

 

सुनिल तटकरे जलसंपदा मंत्री असताना रायगड जिल्ह्यातला कोंढाणे धरणाचा घोटाळा केल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी चौकशी करुन तब्बल एका वर्षानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य