Thursday, 17 January 2019

शरद पवार उपस्थित असलेल्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांनी केला जबरदस्त पॉवर गेम

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुख्यमंत्री देवेंद्र फाडणवीस यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असलेल्या व्यासपीठावरच जबरदस्त पॉवर गेम केला.

 

भाजपची मित्रपक्ष शिवसेना गेले दोन दिवस शेतकरी कर्जमुक्तीसाठी पुन्हा आग्रही भूमिका घेऊ लागली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी दसऱ्यापूर्वी कर्जमुक्ती झालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका घेऊनही मुख्यमॆत्र्यांनी काहीच महत्व दिलं नव्हतं.

 

आज मात्र पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची स्तुती करतानाच त्यांनी अजितदादा पवारांनी केलेल्या दिवाळीपूर्वी कर्जमुक्ती मार्गी लावण्याच्या मागणीची त्वरित दखल घेतली.

 

शिवसेनेचे मंत्री सोमवारी मुख्यमॆत्र्यांना कर्जमुक्तीसाठी भेटणार आहेत, तसेच जिल्ह्यांमध्ये शिवसेना आंदोलनही करणार आहे. मात्र त्याआधीच राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन मुख्यमॆत्र्यांनी शिवसेनेला श्रेय मिळू न देण्याचा पॉवर गेम केल्याचं मानलं जातंय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य