Thursday, 13 December 2018

भाजप आमदाराच्या अरेरावीचा आणि शिवीगाळीचा व्हिडिओ व्हायरल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातील भाजप आमदारांची मुजोरी काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. भाजप आमदारांना सत्तेचा माज आलाय का असा प्रश्न सातत्याने घडमाऱ्या या घटनांमुळे उपस्थित होत आहे .

 

नागपुरमधील रामटेकच्या आमदारांनी महिलेशी असभ्य वर्तन केल्यानंतर आता मुंबईतील आमदार अमित साटमांच्या अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आमदार अमित साटम अंधेरी परिसरातील फेरीवाल्यांना शिवीगाळ करतांना या व्हिडिओत दिसत आहे.

 

अंधेरी रेल्वे स्थानकाच्या आवारात फोरीवाल्यांना बसण्यास मनाई अतानाही त्यांचा व्यवसाय सुरु असतो. यावर साटम यांनी संताप व्यक्त केला. यावेळी साटम यांनी पोलिसांसोबतही गैरवर्तन केले. या व्हिडीओमध्ये साटम फेरीवाल्यांना शिवीगाळ करतांना, तर काहींना मारहाण करतांना आढळून आले आहेत.  

loading...

Top 10 News

राशी भविष्य