Sunday, 18 November 2018

मुंबई विद्यापीठाच्या निकालाने टेंशनमध्ये आहात? या वेबसाइटला भेट द्या

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सहन कारावा लागत आहे. ऑनलाईन उत्तरपत्रिका तपासत असताना होणाऱ्या चुकांचा मनस्ताप विद्यार्थ्यांनाच सहन करावा लागतो आहे. मात्र विद्यार्थ्यांना आता काही अंशी दिलासा मिळणार आहे. मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन वेबसाइट चालू केली आहे. 

मुंबई विद्यापीठाने प्रथम सत्रातील एकूण 477 परीक्षांपैकी 463 निकाल जाहीर  केले आहेत. या निकालांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाबाबत शंका किंवा तक्रार असेल अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने  https://www.asia-sp.in/MU/results.php  हे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थी त्यांच्या निकालासंदर्भातील शंका ऑनलाईन पद्धतीने दाखल करु शकतात. दाखल केलेल्या तक्रारींचे प्राथमिकरित्या निरसन केले जाईल असे कुलगुरू डॉ. धीरेन पटेल यांनी सांगतिले आहे. तसेच या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे निकालही जाहीर केले जाणार आहेत.

वाणिज्य शाखेच्या निकालातील जवळपास 500 हून अधिक तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या निकालपत्रात (गॅजेट कॉपी)  Absent असा शेरा असल्यास, विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. त्यांनी निकालपत्राच्या शेवटच्या रकान्यामधील शेरा पहावा,  त्या रकान्यामध्ये RR असा उल्लेख असल्यास अशा विद्यार्थ्यांचे निकाल हे राखीव ठेवण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत अशा विद्यार्थ्यांचे निकाल हे येत्या 10 दिवसात लावण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असून या संदर्भात परीक्षा विभागामार्फत परिपत्रक निर्गमित केले असल्याचे परिक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जून घाटूळे यांनी सांगितले


विधी शाखेच्या निकालासंदर्भात ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे शुन्य ते चौदा (0-14) असे गूण बहाल करण्यात आले होते अशा 967 विद्यार्थ्यांचे यशस्वीरित्या निकाल जाहीर करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश अर्ज करण्यासाठी 8 सप्टेंबर 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भात विद्यापीठाने परीपत्रक काढले आहे.  

 

तारीख पे तारीख करत पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाने डेडलाइन हुकवली. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला जवळपास सहाव्यांदा डेडलाईन बदलत 6 सप्टेंबर अशी डेडलाईन दिली होती. मात्र, मुंबई विद्यापीठाने यावेळीही डेडलाईन चुकवली आहे. अजूनही विद्यापिठाकडून 14 निकाल लावण्याचे बाकी असून मुंबई विद्यापीठाने निकालासाठी 19 सप्टेंबर ही नवी डेडलाईन दिली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य