Sunday, 20 January 2019

गणेश विसर्जन सोहळ्याला गालबोट; राज्यभरात 13 जणांचा मृत्यू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यभरात गणपती विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे या विसर्जन सोहळ्याला गालबोट लागल्याचे पाहायला मिळाले.

 

पुणे, नाशिक, जळगाव, आळंदी तसेच औरंगाबाद येथे एकूण 13 जण बुडाल्याची घटना घडली.

 

पुणे, वाकड आणि मरकळ येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. तर, नाशिकच्या मुंगसरे गावाजवळील तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू

झाला.

 

नाशकात विसर्जनादरम्यान पाय घसरून 18 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. तर, औरंगाबादेतील बिडकीन भागातही विसर्जनादरम्यान तीन जण बुडाल्याची धक्कादायक

घटना घडली.

 

तर, बीडमधील माजलगाव येथे उमरी नदीपात्रात विसर्जनावेळी एका 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. तर, आळंदीतील मरकळ येथे इंद्रायणी नदीत गणपती विसर्जन

करण्यासाठी गेलेल्या अठरा वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

 

तसेच औरंगाबादेतील पैठण तालुक्यातील शिवनाई तलावात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन मुलाचा बुडून मृत्यू झाला.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य