Wednesday, 16 January 2019

मुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य

User Rating: 1 / 5

Star ActiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज,मुंबई

 

परदेशातून आणलेल्या पेंग्विन मुळे मुंबईतील राणीच्या बाग पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. आता हे पेंग्विन पाहण्यासाठी तसेच बागेत

 सफर करण्यासाठी पर्यटकांना दहापट प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहे. महत्वाची बाब म्हणजे राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य

 असल्याचे चित्र दिसत आहे. कारण, पेंग्विन व्यतिरीक्त इतर कोणतेही प्राणी इथे नाहीत.  

 

 यापूर्वी या राणीच्या बागेत पुरेसे प्राणी होते.  मात्र, महापालिकेकडून केवळ आता फायबरचा वापर करत प्राणी दाखवून सौंदर्य वाढविण्यात

 आले आहे. विविध प्राण्यांचे निर्जीव पुतळे राणीच्या बागेत ठेवण्यात आले आहेत.

 

 पर्यटकांची संख्या वाढत असतांना मात्र लहान मुलांना पाहायला मिळेल असे प्राणी राणीच्या बागेत उरलेले नाहीत.

 पेंग्विन वगळता एक ही प्राणी पर्यटकांना पहायला मिळत नाही. त्यात झालेली ही दहापट शुल्क वाढ यावर आता पर्यटकांनी नाराजी व्यक्त

 केली आहे .

 

असे आहेत राणीच्या बागेतील नविन प्रवेश शुल्क

3 ते 12 वर्षांपर्यंत मुलं - 25 रु.

12 वर्षांवरील प्रौढ व्यक्ती - 50 रु.

12 वर्षांवरील 2 प्रौढ व्यक्ती आणि 3 ते 12 वर्षांवरील 2 मुलं - 100 रु.

शैक्षणिक सहलींसाठी गटानं येणाऱ्या खासगी शाळांतील 3 ते 12 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी - 25 रु.

महापालिका शाळांतील विद्यार्थी - विनामूल्य

परदेशी अभ्यागत 3 ते 12 वर्षांपर्यंत मुलं - 200 रु.

loading...

Top 10 News

राशी भविष्य