Saturday, 17 November 2018

‘वंदे मातरम'च्या वादात शिवसेनेचीही उडी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात 'वंदे मातरम्'च्या सक्तीच्या मागणीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

राज्यात शाळा, कॉलेज तसंच सरकारी कार्यालयांमध्येही वंदे मातरम गाण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेण्याची मागणी भाजप आमदार राज पुरोहित यांनी

केली. मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

 

पण, गळ्यावर सुरी ठेवलीत तरी वंदे मातरम बोलणार नाही असा इशाराच एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी दिला. तर मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो.

 

मात्र, माझा धर्म मला वंदे मातरम् म्हणण्याची परवानगी देत नाही असं सपा आमदार अबू आझमी यांनी म्हटले. पण, या वादात आता शिवसेनेनंही उडी घेतली.

 

इतकीच लाज वाटत असेल तर इथून निघून जा असा संताप रावतेंनी व्यक्त केला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य