Wednesday, 16 January 2019

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

लहान मुल म्हणजे देवाघरचं फुल असं म्हटलं जातं. पण समाजात असे अनेक नराधम आहेत जे या उमलणाऱ्या कळ्यांना चिरडून टाकतात. असाच एक घृणास्पद प्रकार मुंबईच्या एका आंतरराष्ट्रीय शाळेत घडला.

 

ज्याच्यावर विश्वास ठेवायचा त्याच विश्वस्तानं घात केला. याच विश्वस्तावर लहान मुलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. शाळेच्या सुट्टीदरम्यान शिक्षकच लहान मुलांना या विश्वस्ताच्या केबिनमध्ये पाठवत असे. हा विश्वस्त फ्रेंच नागरिक असून तोच मुलांचं शोषण करत असल्याचा आरोप पालकांनी केला.

 

या प्रकरणात आतापर्यंत दोन पीडित मुलं समोर आली आहेत. ज्यात एक मुलगा आणि मुलीचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी ट्रस्टी पॅटिसवर गुन्हा नोंदवला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य