Friday, 18 January 2019

म्हणून यंदा राज्यात मान्सून लांबणीवर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

केरळला नेहमीपेक्षा एक दिवस आधीच दाखल झालेल्या मान्सूनची प्रगती रखडली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता आणखी 3 ते 4 दिवस तरी राज्यात मान्सूनचं आगमन लांबण्याची शक्यता अधिक आहे.

 

पश्चिम बंगालच्या उपसागरातील मोरा चक्रीवादळामुळे सर्व बाष्प इशान्यकडे खेचलं गेल्याने मॉन्सूनच्या पुढील वाटचाल रोखली गेली आहे. केरळला आलेल्या मॉन्सूनने अजून संपूर्ण केरळ, तामिळनाडू अद्याप पूर्णपणे व्यापला नसून येत्या ३ ते ४ दिवसात कर्नाटक, तामिळनाडू, रायलसिमा आणि अरबी समुद्राच्या आणखी काही भागात मॉन्सूनच्या प्रवेशाच्या दृष्टीने अनुकुल परिस्थिती असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

 

दरम्यान, राज्यात येत्या 24 तासात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह पावासाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 7 ते 9 जून दरम्यान कोकण, गोवा व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य