Sunday, 20 January 2019

भर दिवसा घरात घुसून तरुणाचा तरुणीवर तलवारीने वार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

नागपुरात भर दिवसा तरुणीवर तलवारीने हल्ला केल्याचा प्रकार प्रताप नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तुकडोजी नगरमध्ये घडला. यात युवती गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

पीडित तरुणी साडे अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान आपल्या घरी असताना शुभम मरस्कोले नावाचा युवक तलवारी सारखं शस्त्र घेऊन तिच्या घरी गेला आणि तिच्यावर वार केले. यात तरुणी गंभीररीत्या जखमी झाली. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीला मिळेल त्या वाहनाने रुग्णालयात पोहचवलं आणि काही वेळातच आरोपीला ताब्यात घेतलं. शुभम विवाहित असून संबंधित युवतीचा परिचित असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला असून हा हल्ला प्रेम प्रकरणातून तर झाला नाही ना याचा शोध पोलीस घेत आहे.

भर दिवसा तरुणीवर हल्ला झाल्याने परिसरात भीतीच वातावरण पसरलं असून तरुणी जीवनाशी झुंज देत आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य