Sunday, 20 January 2019

नाशिकहून मुंबईला येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘हा’ अलर्ट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

नाशिकहून  मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस 19 ते 21 ऑक्टोबरपर्यंत 3 दिवस तर भुसावळ-मुंबई, मुंबई-भुसावळ पैसेंजर देखील 21 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने नाशिक, मुंबईकडे अप-डाऊन करणाऱ्या चाकरमान्यासह सर्व सामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

रेल्वेसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनमाड, भुसावळ आणि इगतपुरी इथे यार्डमध्ये रिमोल्डींगचे काम करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवार 19 ते रविवार 21 ऑक्टोबरपर्यंत 3 दिवस मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस तर भुसावळ-मुंबई पैसेंजर रद्द करण्यात आली आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य