Monday, 21 January 2019

भुजबळांना न्यायालयाचा दिलासा, आता परवानगीशिवाय देशात कुठेही फिरता येणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी मनी लॉंड्रिंग कायद्याखाली राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती.

2 वर्षे कारावासात राहिल्यानंतर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता.

पण आता मुंबई उच्च न्यायालयानं माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिलासा दिला आहे.

त्यांना देशभरात कुठेही जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

तसेच मुंबई बाहेर जाण्यास त्यांना न्यायालयाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.

मात्र राज्याबाहेर जाताना तपास अधिकाऱ्यांना कळविणे अनिवार्य आहे.

तसेच राज्याबाहेरील ठावठिकाणाची माहिती तपास अधिकाऱ्यांना वेळोवेळी कळविणे आवश्यक आहे. असा आदेश त्यांना न्यायालयानं सुनावला आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य