Friday, 18 January 2019

पेट्रोल आणि डिझेलचा भडका, वाहनचालकांचे बजेट बिघडणार...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

देशभरात सामान्य जनतेला महागाईचे चटके बसत असताना इंधन दरवाढ सुरुच आहे. गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेल मध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. काल मध्यरात्री पासून पेट्रोल हे 16 पैसे तर डिझेल 20 पैसे एवढ्यानी वाढलंय त्यामुळे सामान्य जनता संताप व्यक्त करत आहेत. 

गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलची सातत्यानं दरवाढ होतेय. यामुळे आता सामान्यांचं बजेट चांगलंच बिघडू लागलं आहे. गेल्या पंधरा दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे दर तीनवेळा वाढवण्यात आलेत.

देशभरात सगळ्यात महाग इंधन हे महाराष्ट्रात मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाचे दर वर चढत आहेत. आज मुंबईत पेट्रोलचे दर 86.80 एवढे आहेत तर डिझेलचे दर 75.82 एवढे आहेत. पुण्यात पेट्रोलचे दर हे 86.58 पैसे तर डिझेल 74.44 पैसे एवढी झाली आहे. रूपयाच्या घसरगुंडीमुळे इंधनदरात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी केली आहे. पेट्रोल आणि डिझेल यांचे दर त्यावर असलेल्या करांमुळे वाढत आहेत जर हे दर जीएसटीच्या कक्षेत आणले गेले तर ते कमी होतील असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे. 

 

पेट्रोल, डिझेलचे दर आणखी भडकले

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य