Saturday, 17 November 2018

मुंबई-पुणे महामार्गाच्या दुतर्फा तुमच्यावर असा असेल वॉच...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या वाहन चालनकांवर ट्रॅफिक पोलिसांचा तिसरा डोळा नजर ठेवून आहे. वेगाला चाप लावण्यासाठी महामार्ग पोलिसांचे स्पीड कॅमेरे अखेर इन ऍक्शन झाले आहेत. 

एक्स्प्रेस वेवर गाडी येताच चालक अक्षरशः वेगाशी स्पर्धा करतात. त्यामुळेच ओव्हर स्पीडिंग आणि लेन कटिंगमुळे एक्स्प्रेस वेवर अपघाताच्या वारंवार घटना घडत असतात. याचीच गंभीर दखल घेऊन अपघात होऊ नयेत म्हणून पोलिसांनी मुळावरच घाव घालण्यास आजपासून सुरुवात केली आहे.

काय असणार ट्रॅफिक पोलिसांची भूमिका -

  • चालकांना दंड ठोठावणे हा कॅमेऱ्याचा वापर करण्यामागचा आमचा उद्देश नाही
  • चालकांना वाहतूक नियमांची शिस्त लावणे हा प्रमुख हेतू 
  • स्पीड कॅमेऱ्याचा वापर करण्यास सुरुवात 
  • अपघात घडू नयेत हा आमचा प्रयत्न असून यासाठी ओव्हर स्पीडिंग आणि लेन कटिंगचे गुन्हे रोखणे आमचे टार्गेट 
  • चालक किती स्पीडमध्ये होता हे त्याला पुराव्यानिशी दाखवण्यासाठी कॅमेरा महत्त्वाची भूमिका बजावणार
  • स्पीड कॅमेरे ओव्हर स्पीडिंग आणि लेन कटिंग करणाऱ्या वाहनांचे फोटो काढणार
  • हे फोटो टोलनाक्यावर तैनात असणाऱया पोलिसांकडील यंत्रणेकडे येणार.
  • पोलीस त्याची प्रिंट काढून संबंधित कारचालकाच्या हातात देऊन दंड करणार
  • यामुळे आम्ही स्पीडमध्ये नव्हतोच असा दावा करून चालकांना हुज्जत घालता येणार नाही.

रस्त्यावर सूसाट वाहन चालवताय? तुमच्यावर आहे तिसऱ्या डोळ्याची नजर

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य