Friday, 18 January 2019

महिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

तुषार कोहळे , जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

पोलीस हे सर्वसामान्य माणसाच्या रक्षणासाठी असतात. मात्र पोलीसच गुंडगिरी करत असतील तर? नागपूरमध्ये महिला पोलीसाची गुंडगिरी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कॅद झाली आहे.

आयशा शेख या माहीला कॉन्स्टेबलने आपल्या पदाचा गैरवापर करत एका दुकानदाराला त्याच्या दुकानात जाऊन मारहाण केली. 

इतकंच नाही, तर दुकानातील शीतपेयाच्या बाटलीने तिने दुकानदाराचं डोकंही फोडलं. तसंच दुकानाच्या गल्ल्यातील पैसेही जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न केला. पुरेंद्र पशुपतीनाथ असं जखमी दुकानदाराचं नाव आहे.

हा धक्कदायक प्रकार मानकापूर परिसरातील सिक्स टेन शॉपिंग सेंटरमध्ये घडला.

 

nagpur-police1908.png

यानंतर दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरोपी महिलेला आणि तिच्या कुटुंबाला दुकानातच डांबून ठेवलं.

ज्या मानकापूर पोलीस ठाण्यात ही महिला कॉन्स्टेबल कार्यरत आहे, त्याच पोलीस ठाण्यात तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार ही घटना रिझर्ववेशनसंदर्भातील पैशाच्या वादातून झाल्याचं सांगण्यात येत आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य