Tuesday, 22 January 2019

शाळकरी मुलीचा विनयभंग, नराधम सीसीटीव्हीमध्ये कैद!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

रवी सपाटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

अनेक मुलींचा विनयभंग करणा-या एका नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ठाण्यातील कळवा भागात एका इमारतीच्या लिफ्टमध्ये या नराधमाने एका शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार CCTV कॅमेरामध्ये कैद झाला.  त्याच आधारावर या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. शंकर सिंग असं या 24 वर्षीय आरोपीचं नाव असून हा नराधम मुलींचे डान्स क्लासेस घेतो.

कसं पकडलं नराधमाला?

कळवा भागातील एका इमारतीत जेव्हा या तरुणाने अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केला, तेव्हा हा प्रकार CCTV मध्ये कैद झाला.

याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या आरोपीचे 100 फोटो काढले आणि परिसरातल्या चहाच्या टपरीवाल्यांपासून ते भाजीवाल्यांपर्यंत सर्वांना वाटले.

यातूनच पोलिसांच्या हाती सुगावा लागला आणि त्यांनी या नराधमाला ठाण्यातील वागळे इस्टेट भागातून अटक केलं.

पीडित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सध्या या आरोपीला जेल कस्टडी देण्यात आली आहे.

मात्र हा या नराधमाचा पहिलाच गुन्हा नाही, तर अशाच स्वरूपाचा गुन्हा त्याने ठाण्यातील कापूरबावडी परिसरातही यापूर्वी केला होता.

त्यामुळे त्याला आता कापूरबावडी पोलीसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.


सीसीटीव्हीमुळे या नराधमाला पकडणं शक्य झालं आहे. म्हणूनच सोसायटी, पार्किंग, दुकानं अशा ठिकाणी CCTV बसवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

 

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य