Sunday, 20 January 2019

मराठा आंदोलनावेळी तोडफोडप्रकरणी अटकसत्र सुरु...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठा आंदोलनादरम्यान हिंसाचाराचा भडका उडाल्यानं शहरात मोठं नुकसान झालं होतं. तोडफोड, जाळपोळप्रकरणी पोलिसांकडून अटकसत्र सुरू झाले आहे. मराठवाड्यात आतापर्यंत 5 हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

विविध ठिकाणाहून 60 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं असून 20 आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आलं आहे.

ही कारवाई नेमकी कशी आणि कुठे कुठे करण्यात आलीये ते पाहूया - 

  • औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीतील तोडफोड आणि जाळपोळप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. याप्रकरणी ३० संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
  • शिवाय औरंगाबाद-जालना या रेल्वे मार्गावर ल्वे रोखल्याप्रकरणी सुमारे ४ हजार आंदोलकांवर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत.
  • परभणी जिल्ह्यात ४४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून हे गुन्हे तोडफोड आणि जाळपोळ केल्याची आहेत. तर रेल्वेवर दगडफेक करणाऱ्या ९ जणांवर रेल्वेने गुन्हे दाखल केले आहेत.
  • बीड जिल्ह्यात ३२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.
  • लातूर जिल्ह्यात वाहनांवर दगडफेक आणि बसवर दगडफेक केल्याप्रकरणी २७ जणांवर गुन्हे दाखल कंर्यात आली आहेत.
  • उस्मानाबाद जिल्ह्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच, तर भूम शहरात बसवर दगडफेकप्रकरणी ३० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
  • नांदेड जिल्ह्यात सात पोलीस ठाण्यांत ३०० हून अधिक जणांवर गुन्हे नोंदविले आहेत. शहरात आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीचा प्रकार झाला होता.
  • जालन्यात २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये रस्त्यावर उतरून तोडफोड, दगडफेक केल्याचे गुन्हे आहेत.
  • हिंगोली जिल्ह्यातील सेनगावमध्ये जाळपोळ केल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आहेत.
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य