Thursday, 17 January 2019

अंगारकीनिमित्त सिद्धीविनायक, दगडूशेठ मंदिरासह ठिकठिकाणी भाविकांची गर्दी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आज अंगारकी चतुर्थीनिमित्त ठिकठिकाणी गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. मुंबईच्या सिद्धीविनायक गणेश मंदिरातही पहाटेपासून भाविकांची रिघ पहायला मिळत आहे.

यानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पहाटे 3 वाजल्यापासून भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून यावेळी मंदिरात फुलांची नयनरम्य अशी सजावट करण्यात आली आहे.

या सजावटीत मंगल कलश वापरण्यात आले आहेत. आजच्या दिवशी गणरायाच्या आशीर्वादाचा वर्षाव सर्व भक्तांवर व्हावा या कल्पनेतून या सजावटीचा संकल्प करण्यात आला आहे.

आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी सर्व भक्तांनी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे .

अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरांमध्ये भाविकांची रीघ

  • अंगारकीनिमित्त मुंबईचे सिद्धीविनायक मंदिर सजून उठले
  •  तसेच सिद्धीविनायक गणेश मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी
  • श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही पहाटे 3 वाजल्यापासून भक्तांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी
  • श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात फुलांची नयनरम्य अशी सजावट
  • आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी

 

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य