Sunday, 18 November 2018

मुख्यमंत्र्यांच्या शेळ्या गायब

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर

चोरट्यांनी चोरीच्या सगळ्या सीमा ओलांडल्या आहेत. घरफोडीचे सत्र कायम असताना शेळ्या -बोकड चोरट्यांच्या टोळीची भर पडली आहे. यामुळे पोलिसांसमोर आता शेळी चोरी करणाऱ्या टोळीचे आव्हान निर्माण झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चक्क 170 शेळ्या चोरीला गेल्याची घटना घटली आहे.

विशेष बाब म्हणजे ज्या शेतात या शेळ्या बांधल्या होत्या, ते शेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वडिलोपार्जित आहे. महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शेतातच चोरी झाल्यानं सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. अंधाराचा फायदा घेत ही चोरी केल्याचं समजतयं.

या शेळ्यांची किंमत साडेसहा लाख रुपये असल्याचं सांगितलं जातयं. मूल शहरातील कुरमार मोहल्ल्यातील कुरमार बांधवांच्या या शेळ्या होत्या. यासंदर्भात मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय…

पोचू कटकेलवारने या शेळ्या सकाळच्या सुमारास शेतात चरण्यासाठी नेल्या होत्या. सायंकाळी त्या शेळ्यांना जवळच असलेल्या फडणवीस यांच्या शिवारात ठेवल्या. मात्र रात्रीच्या सुमारास या सर्व शेळ्या गायब झाल्या. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर कुरमार बंधु आणि पोलिसांनी शोधाशोध सुरु केली….  मात्र त्यांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही.

तसचं 5 मे2018 रोजी वैजापूर तालुक्यातील भायगाव येथूनही चार शेळ्या चोरून नेल्याची घटना रात्री घडली होती. अंबादास अर्जून मोटे यांनी त्यांच्या शेळ्या छपरात बांधून ठेवल्या होत्या. या शेळ्यांची किंमत १५ हजार रुपये इतकी असून याप्रकरणी मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य