Wednesday, 16 January 2019

मोदी सरकारवर काँग्रेसच्या आमदाराचं तोंडसुख...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलच धारेवर धरलं आहे. सामान्य नागरिक या महागाईत त्रस्त झाले असून सरकार फक्त घोषणाबाजी करत आहेत. भाजप सरकार सर्वच स्तरावर अपयशी झालेत. अशी टीका काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत.

मोदींनी गेल्या साडेचार वर्षातील आपले भाषण ऐकलीत तर त्यांनाच त्यांच्या कार्यशैलीवर संशय निर्माण होईल. त्यांच्या आतापर्यंतच्या जुमलेबाजीत मोदींनी जनतेला फसवण्याचे काम केले आहे. मोदींनी आपली जुमलेबाजी ऐकलीत तर मोदींही स्वतःला मत देणार नाही अशी प्रखर टीका माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी केली आहे.

पेट्रोल आणि डिझलच्या किमती आंतराष्ट्रीय बाजारात वाढल्या नसतानाही भारतात मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात दरवाढ केली आहे.

या सरकारचे करायचे काय असा सवाल करत सर्वसामान्य माणसांना आजच्या भारत बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस यांनी केले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारत बंदला वर्ध्यात प्रतिसाद मिळला. बजाज चौक येथून मोर्चा काढत काँग्रेस रोको व डाव्या आघाडीने सरकारचा निषेध नोंदविला. दुकाने बंद करून नागरिकांना भारत बंदचे आवाहन करण्यात आले. बाजारपेठेत मोर्चा काढण्यात आला. महिला काँग्रेसच्या चारुलता टोकस व आमदार रणजित कांबळे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्च्यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

loading...

Top 10 News

राशी भविष्य