Friday, 18 January 2019

मॅट्रीमोनिअल साईट्सच्या माध्यमातून 5 महिलांशी केलं लग्न आणि...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, नागपूर

आजच्या काळात प्रत्येकजण आपलं काम सोप करण्यासाठी ऑनलाईन साईट्सचा वापर करत असतो मात्र ही ऑनलाईन पद्धत आपल्यासाठी योग्य आहे की नाही याचा विचारही केला जात नाही.

यामुळे काहीवेळा याचे वाईट परिणामही पहायला मिळतात. असाचं एक चकित करून टाकणार प्रकार नागपूरमध्ये घडला आहे.

नागपूरच्या बेसा बेलतरोडी परिसरात मँट्रीमोनिअल साईटवरून महिलांना भेटून एकापाठोपाठ एक असे 5 लग्न करणाऱ्या आकाश माणिकलाल अग्रवाल याला अटक करण्यात आली आहे.

मणिकलाल हा एका महिलेला भेटायला आला असतांना महिलेने विनयंभंगाची तक्रार दाखल केल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणात नागपुरच्या बेलतरोडी पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी आरोपीच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

या आरोपीने अनेक महिलांसोबत लग्न करून त्यांची संपत्ती अवेध पद्धतीने विकल्याची माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे.

अशाच एका महिलेचा 40 लाखांचा फ्लँट आरोपीने विकला आहे तसेच एका महिलेशी अशाच प्रकारे लग्न करून 20 लाखांची फसवणुक केल्याची माहिती पोलीसांना मिळाली असून पोलिस यासंदर्भात तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मँट्रीमोनिअल साईटवरून महिलांना भेटून एकापाठोपाठ एक असे 5 लग्न करणाऱ्या आकाश माणिकलाल अग्रवाल याला अटक करण्यात आली असून या आरोपीने आरोपी अजय अग्रवाल, अजय कुंभार आणि अजय कुमार अशी नावे धारण केली होती.

धक्कादायक म्हणजे हा आरोपी महिलांसोबत मैत्री करून त्यांना लग्नाच्या बंधनात अडकवायचा आणि नंतर त्यांची संपत्तीही लुटाचयचा.

हा आरोपी विधवा आणि घटस्फोटीत महिलांना ‘सेकंड शादी डाँट काम’च्या माध्यमातून भेटायचा आणि आपल्या पत्नीचे निधन झाल्यामुळे दुसरे लग्न करतोय असे सांगायचा.

या प्रकरणात या आरोपीला आणखीही काही लोकांनी मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. मणिकलाल या आरोपीने आतापर्यंत अशाप्रकारे 5 लग्न केल्याची कबुलीही दिली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य