Wednesday, 16 January 2019

ऑनलाइन मैत्री पडली महागात...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

आजच्या काळात सोशल मीडिया हा सर्वांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. मात्र याचं सोशल मीडियामुळे आपण विचारही करू शकणार नाही अशा काही गोष्टीदेखील घडत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीजण अनोळखी लोकांशी मैत्री करतात, मात्र काहीवेळा या मैत्रीला एक वेगळचं वळण लागतं. अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना नागपूरमध्ये फ्रेंडशिप डेच्या पूर्वसंध्येला घडली आहे.

फेसबुकवरील मैत्री नागपूरच्या या पीडित मुलीला चांगलीच महागात पडली. मैत्रीला काळीमा फासणारी ही घटना दुर्दैवाने फ्रेंडशिप डेच्याच आधी घडल्याने यापुढे तरी सर्वांनी ऑनलाइन मैत्री करताना सावधान राहिले पाहिजे.

काय आहे प्रकरण?

  • नागपूरच्या लकडगंजमध्ये पोलिसांनी एका अशा आरोपीला अटक केली आहे, ज्याने फेसबुकवरून मुलीसोबत मैत्री केली आणि तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, तसेच तिचे फोटोही वायरल केले.
  • पोलिसांच्या ताब्यात असलेला हा आरोपी दिसतो तेवढा साधा नाही त्याने जे कृत्य केलं ते मैत्रीच्या नावाला काळिमा फसणार आहे.
  • सतीश रामटेके असं या आरोपीचं नाव असून त्याने पीडित मुली सोबत 2016 मध्ये फेसबुक च्या माध्यमातून मैत्री केली. काही दिवसानी ती मैत्री प्रेम प्रकरणात बदलली मात्र त्याने त्याच्या सीमा ओलांडल्या.
  • त्याने कॉलेज मधून पीडित युवतीला बाहेर जाण्याच्या बहाण्याने आपल्या घरी नेले आणि तिला गुंगीचं औषध दिलं आणि तीच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, त्यावेळी त्याने फोटो सुद्धा काढले.
  • युवतीला जाग आली तेव्हा तिने आपल्यासोबत काय केल्याची विचारणा केली असता. त्याने तिला कोणाला सांगितलं तर तुझे फोटो वायरल करेन अशी धमकी दिली.
  • काही दिवसांपासून त्यांचे पटत नसल्याने युवती त्याच्यापासून दूर राहायला लागली म्हणून त्याने तिचे फोटो कॉलेज च्या ग्रुप वर वायरल केले.
  • पीडित युवतीला याची माहिती मिळताच तिने पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला सगळं प्रकार पोलिसांना सांगितला, पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून त्याच्यावर वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
  •  सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
loading...

Top 10 News

राशी भविष्य