Thursday, 17 January 2019

भुजबळांची भेट टाळण्यासाठी विधानसभेची बेल आली धावून...

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी 2 वर्षे तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर  राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ विधानसभेच्या कामासाठी विधानभवनात दाखल झाले. त्यांनी कामकाजात सहभागही घेतला. तुरुंगातून सुटल्यानंतर भुजबळ यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे अनेक आमदार आणि कार्यकर्ते विधानभवनाच्या गेट वर बराच वेळ उभे राहिले होते. 'साहेबांना रिसिव्ह' करताना मीडियाच्या कॅमेऱ्यात आपण कसे दिसू याची योग्य काळजी काही कार्यकर्त्यांनी घेतली होती. तुरुंगात असताना ज्या आमदारांनी,मंत्र्यांनी भुजबळाची भेट घेणं टाळलं त्याच आमदार, मंत्र्यांनी भुजबळांच्या स्वागतासाठी विधानभवनाच्या गेटवर हजेरी लावली होती.

भुजबळांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार, मंत्री, राज्यमंत्री हे सगळे तयार होते. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र दिसत नव्हते. दादा येणार की नाही अशी कुजबुज ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू झाली होती.

.... आणि अखेरीस अजित दादा भुजबळांच्या स्वागतासाठी खाली उतरले. चालत चालत ते विधानसभेपासून विधानपरिषदेच्या बिल्डिंग पर्यत आलेही.मीडियाच्या टीम ला ’क्रॉस' करत ते पुढे आले पण, आणि अचानक विधानसभेच्या सभागृहाची बेल वाजू लागली. या बेलचा आवाज कानी पडताच अजित दादा जागीच थांबले आणि आपल्या खर्ड्या आवाजात कार्यकर्त्यांना निरोप दिला, " हे बघा आता विधानसभेच्या कामकाजाची सुरवात होतेय, मला आत जावं लागणार आहे, त्यामुळे तुम्ही भुजबळ साहेबांना व्यवस्थित रीसिव्ह करा" आणि इतकं बोलून अजित दादांनी यू टर्न घेतला आणि लगेच आल्यापावली निघून गेले. दादांच्या या यू टर्न मुळे दादांना भुजबळांपेक्षा विधानसभेचं कामकाज महत्वाचं होतं ? की भुजबळांना रिसिव्ह करणं टाळायचं होतं ? या प्रश्नांची उत्तरं मात्र अनुत्तरितच राहिली.

 

Tushar Shete
News Editor

loading...

Top 10 News

राशी भविष्य