Sunday, 18 November 2018

माणुसकीला काळीमा फासणारी घटना, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत...

User Rating: 2 / 5

Star ActiveStar ActiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, धुळे

साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावाजळील राईनपाडा येथे रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बेभान जमावाने 5 जणांना ठेचून मारले होते. मुले पळवणारी टोळी असल्‍याच्‍या संशयावरून या 5 जणांची निर्घृणपणे हत्‍या करण्यात आली होती.

या क्रुर घटनेनंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. मात्र, या जमावाने पोलिसांवरही हल्ला चढवला होता. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

यानंतर या घटनेबाबत ही घटना दुर्दैवी असल्‍याचे मुख्‍यमंत्र्यांनी म्‍हंटले असून पिडित कुटुंबियांना राज्‍य शासनातर्फे 5 लाख रुपयांची मदतही मुख्‍यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्‍यात आली आहे, असे मुख्‍यमंत्र्यांनी म्‍हंटले आहे.

  •  मृत पावलेले 5 ही जण आपल्या कुटुंबीयांसह पिंपळनेर गावाजवळ राहत हाते.
  • घटनेनंतर मृतदेह स्‍वीकारण्यास नकार देत कुटुंबियांची दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
  • यानंतर घटनेबाबत ही घटना दुर्दैवी असल्‍याचे मुख्‍यमंत्र्यांनी म्‍हंटले
  • पिडित कुटुंबियांना राज्‍य शासनातर्फे 5 लाख रुपयांची मदतही मुख्‍यमंत्र्यांनी जाहीर केली
  • याप्रकरणी चौकशी सुरू असून काही आरोपी अटकेत

अन् त्या पाच जणांची ठेचून हत्या...

राजधानीत उडाली खळबळ, एकाचं घरात 11 जणांचे मृतदेह...

घाटकोपरमध्ये विमान दुर्घटना, पाहा त्या विमानाची अवस्था...

कांदिवलीत शाळकरी मुलीची आत्महत्या...

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, पायलटसह 5 जणांचा मृत्यू

loading...

Top 10 News

राशी भविष्य