Sunday, 18 November 2018

अन् त्या पाच जणांची ठेचून हत्या...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, धुळे

साक्री तालुक्यातील राईनपाड्यातील ग्रामस्थांनी मुलं पळवल्याच्या संशयावरुन पाचजणांची ठेचून हत्या केली आहे. आज दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मात्र ग्रामस्थांनी पोलिसांनाही जबर मारहाण केली. यात दोन पोलीस जखमी झाले. 

हे पाच ही जण सोलापूरचे आहेत. सातारा आणि सांगलीतील सात जण राईनपाड्यात आले होते. बाजार असल्यानं मुलं पळवायला टोळी आल्याची अफवा यावेळी गावात पसरली. यानंतर ग्रामस्थांनी पाचजणांना ठेचून मारलं.

यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयात टाकून दिले आणि पोलिसांनी देखील मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छोरींग दोरजे साक्रीकडे रवाना झाले आहेत.

पोलीस महानिरीक्षकांनी बंदोबस्तासाठी नंदुरबार, नाशिकसह अन्य जिल्ह्यातील फौजफाटा मागवला आहे.

मृतांची नावे - भारत शंकर भोसले(४५)भारत शंकर माळवे (४०) दादाराव शंकर भोसले(३५) राजु श्रीमंत भोसले(४८) आगणुक श्रीमंत इःगोले(२०)

  • राईनपाडा गावात मुलं चोरणारी टोळक समजुन पाच जणांना बेदम मारहाण...
  • संतप्त ग्रामस्थांकडून जबर मारहाण...
  • पाचजण गंभीर जखमी...
  • पोलीस घटनेस्थळी दाखल
  • संपूर्ण परिसरात तणाव ....
  • गावात दहशतीचे वातावरण 

सोलापुरच्या पोलिसाचा व्हायरल झालेला धक्कादायक व्हिडिओ पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य