Friday, 18 January 2019

ताडोबातील सोनम वाघिणीचा व्हिडिओ व्हायरल, पर्यटक आश्चर्यचकीत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर

चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सोनम वाघिणीच्या शिकारीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भलताच वायरल झालाय. तेलिया धरण परिसरातील अनभिषिक्त राणी असलेल्या सोनम वाघिणीचा हा व्हिडिओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. याच भागात सांबाराची शिकार केल्यावर आपली शिकार ओढून घेऊन जातानाचा हा व्हिडीओ आहे.

सोनम वाघिणीने या भागात सांबराची शिकार केली होती. या भागात असलेली सोनम वाघिण चार बछड्यांची आई आहे. या बछड्याना भरविण्यासाठी सोनमला दर 4 दिवसांनी शिकार करावी लागते. याच भागातील बजरंग नावाचा वाघ म्हणजे तीचा जोडीदार आहे. आपल्या कुटुंबासाठी सांबराची शिकार करत तिने पर्यटकांच्या गर्दीतून ऐटीत शिकार घेऊन गेल्याचा हा व्हिडिओ कॅमे-यात कैद झालाय आणि सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल झालाय. सोनमच्या या धाडसाने पर्यटक मात्र आश्चर्यचकित झाले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य