Sunday, 18 November 2018

मोदींच्या आश्वासनांचा निषेध करत नागपूर युवा काँग्रेसचं 'मोदी एप्रिल फुल' आंदोलन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

1 एप्रिल हा दिवस एप्रिल फुल म्हणून मानला जातो. हजारो तरुणांच्या मनात मोदी सरकारने आपल्याला असंचं काहीस फुल बनवलं असल्याची सध्या भावना आहे. 2014 मध्ये सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोजगार निर्मितीचं आश्वासन सरकारने पूर्ण करण्यास अयशस्वी ठरलंय.

या गोष्टीचा संताप व्यक्त करत आणि सरकारचा निषेध करत नागपूर युवक काँग्रेसने मोदी एप्रिल फुल आंदोलन केलंय. नागपूर विद्यापीठ परिसरातून हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना घेऊन एक लाँग मार्च काढन्यात आला.

१ एप्रिल हा दिवस इतरांना मूर्ख बनवण्याचा दिवस म्हणून संपूर्ण जगात हा दिवस प्रसिद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी प्रत्येक वर्षाला २ कोटी रोजगार निर्मिती चे आश्वासन दिले होते. प्रत्येक्षात मात्र असे काही झाले नाही त्यांनी फक्त तरुणांना मूर्ख बनविले त्यामुळे आज नागपूर युवक काँग्रेस ने मोदींच्या अश्वसनाचा निषेध म्हणून " मोदी एप्रिल फुल" आंदोलन केले.

काँग्रेस ला राहुल गांधींच्या रूपाने नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळाले नंतर नागपूर युवक काँग्रेस चे हे पहिले आंदोलन आहे...नागपूर विद्यापीठ परिसरातून हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना घेऊन एक लॉंग मार्च काढन्यात आला...याचा आढावा घेतला आमचा नागपूरचा प्रतिनिधी तुषार कोहळे याने.

loading...

Top 10 News

राशी भविष्य