Sunday, 20 January 2019

‘संघाला मोदी नकोसे, पंतप्रधानपदी हवेत गडकरी’

User Rating: 1 / 5

Star ActiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला

‘सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदींवर नाराज असून नितीन गडकरी 2019 ला पंतप्रधान व्हावेत अशी संघाची इच्छा आहे,’ असा धक्कादायक दावा पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केलाय. भाजपसह एनडीएच्याही जागा कमी व्हाव्यात ज्यामुळे मोदींचा अडथळा दूर होऊन गडकरींना पंतप्रधान करता येईल असा संघाचा विचार असल्याचा गौप्यस्फोट हार्दिक यांनी केला आहे. विदर्भ युथ फोरमच्यावतीने आयोजित अकोल्यातील एल्गार मेळाव्यात ते बोलत होते.

या कार्यक्रमात त्यांनी मोदींवर चौफेर टीका केली. 2019 मध्ये जर पुन्हा मोदी सत्तेवर आले तर राष्ट्रपती राजवट लागू होवून पुन्हा निवडणूकाच होणार नाहीत, असं म्हणत त्यांनी मोदींच्या एकाधिकारशाहीवर बोट ठेवले. पुढे ते म्हणाले की, नागपुरात आल्यावर दीक्षाभुमीबद्दल समजले. हा जरी संघाचा बालेकिल्ला असला तरी म्हणून ही लगेच संघभूमी होत नाही. नागपूर ही दीक्षाभुमीच राहणार, असं म्हणत त्यांनी संघालाही टोला लगावला.

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत. तर जागृत होत हक्कासाठी एकत्र यावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केलं आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य