Tuesday, 20 November 2018

आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेची खास रणनीति

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी सुरू झाली आहे. मुंबईमधील पदाधिकारी आमदार आणि खासदार यांची बैठक घेतल्यानंतर विदर्भ भागातील पदाधिकारी आणि आमदार खासदार यांची बैठक घेण्यात आली. आगामी निवडणुकीत भाजपला शय देण्यासाठी शिवसेनेने आखली खास रणनीति....
काय आहे ही रणनीती -

भाजप पक्षात नेहमीच नियोजनाला महत्व देण्यात आलं आहे. भाजपने निवडणुकीच्या भरघोस यशाचे महत्व नेहमीच आपल्या पक्ष प्रमुखाला दिले आहे. त्याच धर्तीवर आता आगामी निवडणुकीत बूथ प्रमुखाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. विदर्भातील पदाधिकारी आणि आमदार, खासदार यांची आज सेनाभवन येथे बैठक घेण्यात आली असून विदर्भातील परिस्थितीचा आढावा यात घेण्यात आला. 

आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा आधीच शिवेनेकडून देण्यात आला आहे. यासाठी शिवसेना तयारीला लागली आहे. प्रत्येक मतदारसंघात बूथ प्रमुखांची नेमणूक लवकरच शिवसेनेकडून करण्यात येणार आहे. 

  • विदर्भातील पदाधिकारी आमदार खासदार यांची आज बैठक घेण्यात आली.
  • विभागनिहाय बैठक झाली 
  • बूथ प्रमुख हा महत्वाचं घटक तयार करणार आहोत
  • बूथ प्रमुखाला मतदाराच्या संपर्कात राहायची जबादारी 

बूथ प्रमुखाची कामे -

1 हाच बूथ प्रमुख हा आपल्या मतदारावर ठेवणार नजर

2 मतदानावेळी EVM मशीनचे सील तपासणार 

3 मशीन व्यवस्थित काम करतेय का याची तपासणी

4 मतदान झालं की मशीन सील व्यवस्थित बंद करण्यात आलंय की नाही याची पाहणी 


गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना युतीत राहून लढली. 22 पैकी 18 जागांवर शिवसेनेचे उमेदवार जिंकले. मात्र यावेळी आम्ही सर्व 48 जागा लढवू. उर्वरित 30 उमेदवार कोण असतील याची चाचपणी सध्या सुरू आहे. येणाऱ्या दिवसात ही यादी देखील जाहीर होणार आहे. अशी माहीती शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे.

आगामी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत स्वबळावर शिवसेनेला किती यश मिळेल हे निकालानंतर समोर येईलच. मात्र शिवसेनेने स्वबळासाठी कंबर कसली आहे हे मात्र तेवढचं नक्की...

loading...

Top 10 News

राशी भविष्य