Friday, 18 January 2019

सोलापूरमध्ये बंदला गालबोट, 180 कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

मराठा आरक्षणासाठी सोमवारी सोलापूरात बंद पुकारण्यात आला होता मात्र या बंदला हिंसक वळण लागले आणि दगडफेक करण्यात आली. आंदोलनात दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे. सोलापूर बंद शांततेत सुरू असताना दगडफेक करणाऱ्या 42 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून तर 180 कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

या दगडफेकीत 2 पोलीस आणि एका खासगी वाहनाचे तर 2 हॉटेलचेही नुकसान झाले आहे. बंद दरम्यान शहरात 3 ठिकाणी टायर जाळण्यात आले आहेत. 100 टक्के बंद असताना बंद ला गालबोट लागल्याचे सांगत कायदा हातात घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी स्पष्ट केले आहे.

सोलापूर बंद शांततेत सुरू असताना दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई

  • सोमवारी सोलापूरात बंद पुकारण्यात आला होता, मात्र बंद शांततेत सुरू असताना दगडफेक करण्यात आली
  • दगडफेक करणाऱ्या 42 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून तर 180 कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई
  • दगडफेकीत 2 पोलीस आणि एका खासगी वाहनाचे तर 2 हॉटेलचेही नुकसान
  • 100 टक्के बंद असताना बंद ला गालबोट
  • कायदा हातात घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई, पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांचे स्पष्टीकरण

चाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण...

पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना अभय नाही - मुख्यमंत्री

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या...

आता आरक्षणासाठी धनगर समाजही रस्त्यावर उतरणार...

loading...

Top 10 News

राशी भविष्य