Wednesday, 16 January 2019

मराठा आंदोलन चिघळलं, राज्यभरात आंदोलनाचे पडसाद, पाहा अपडेट...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालेले दिसत आहे .मराठा आरक्षणासाठी औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून मराठा आंदोलकांनी सोमवारी (23 जुलै) रोजी जलसमाधी आंदोलन केले.

यामध्ये गोदावरी नदीत आंदोलक तरुणानं उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र पाटील यांनी ही माहिती दिली.

मराठा क्रांती मोर्चानं महाराष्ट्र बंदची हाक दिली असली, तरी यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. आंदोलकांनी बसेसवर दगडफेक करू नये, अशा सूचना समन्वयकांनी दिल्या आहेत.

वारकरी पंढरपूरहून परतत असल्यानं त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून या सूचना देण्यात आल्या आहेत.

सातारा, सोलापूर, पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तर बुधवारी (25 जुलै) मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे.

कुठे जाळपोळ तर कुठे रास्ता रोको

नवी मुंबई - कामोठे येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळले

मुंबई - चेंबूरमध्ये मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले, भाईंदरमध्ये रास्ता रोको आंदोलन

पुणे - निषेध बाईक रॅलीला सुरुवात होणार, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, मुंबई-पुणे महामार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त.

सोलापूर - तुळजापूर रोडवरील पर्ल गार्डन समोर एसटी बस वर दगडफेक, दोन बसचे नुकसान

सांगली - मराठा आंदोलनातमराठा आंदोलनात पेड समाजकंटकांची घुसले असल्याचा गंभीर आरोप महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

हिंगोली - खालापूर येथे आंदोलकांनी पोलिसांची गाडी जाळली.

औरंगाबाद - मराठा समाज आंदोलकांनी रुग्णवाहिका फोडली.

लातूर - बंददरम्यान तरूणाने केला आत्मदहनाचा प्रयत्न.

रत्नागिरी -  सावर्डे या ठिकाणी मराठा कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मुंबई-गोवा महामार्ग रोखला आहे तसेच महामार्गावरील दुकानेही बंद करण्यात आली आहेत.

परभणी - आंदोलकांकडून प्रसार माध्यमांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. दैनिक सामना आणि पुढारी कार्यालयाची तोडफोड. दोन्ही कार्यालयांवर आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली आहे.

 

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य