Wednesday, 21 November 2018

मराठा आंदोलनात पेड समाजकंटकांची घुसमखोरी - चंद्रकात पाटील

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठ्यांच्या बंदमुळे काहीच साध्य होणार नाही, उलट लोकांची गैरसोयीच होणार आहे असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल कोर्टाने स्वीकारल्याशिवाय आरक्षण देऊच शकत नाही हे वास्तव आहे.

हिंसक आंदोलनातून काहीच साध्य होणार नाही.त्यामूळे हा बंद मागे घ्यावा असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. 

राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आंदोलनात काही पेड समाजकंटक घुसलेत असा गंभीर आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगलीत केला आहे.

हे समाजकंटक मराठा आंदोलन बदनाम करत असल्याचही त्यांनी नमूद केलं आहे.

आरक्षण देणं हे सरकारच्या हातात नाही. ही बाब न्यायालयाच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे न्यायालयाने याबाबत निर्णय घ्यायचा आहे.

जलसमाधी, आंदोलन करून, बसेस जाळून, आरक्षण मिळणार नाही असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच सरकार आणि मुख्यमंत्री चर्चेला तयार आहेत, मराठा आंदोलकानी आपले आंदोलन मागे घ्यावे , असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना केल आहे. 

मराठा समाज पेटून उठला, उद्या मुंबईसह नवीमुंबईत बंद !

सकल मराठा समाजाचं आंदोलकांना आवाहन....

मराठा समाज आक्रमक, शिंदे यांच्या कुटुंबियांना सरकारचं आश्वासन....

मराठा आंदोलकाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक...

loading...

Top 10 News

राशी भविष्य