Sunday, 18 November 2018

पाहा हा एक फूट लांब आणि तब्बल चार किलो वजनाचा केशर आंबा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद

एक फूट लांब आणि तब्बल चार किलो वजन असलेला केशर आंबा अनेकांच्या भुवया उंचावून जात आहे. त्यामुळे हा चार किलो वजनाचा आंबा पाहण्यासाठी आता अनेक जण झुंबड गर्दी करू लागले आहेत.

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ओम अंगुले यांच्या शेतातील केशर आंब्याच्या झाडाला चार किलो वजनाचे आंबे लगडले आहेत. त्यामुळे अनेकजण या आंब्याला पाहून अक्षरशः आश्चर्याने पाहत आहेत.

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ओम अंगुले या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर केशर आंब्याची लागवड केली आहे. यंदा झाडाला मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली आहे. त्यातील एका झाडाला चक्क एक फूट लांब आणि साधारणतः तीन ते चार किलो वजनाचे भलेमोठे आंबे लगडले आहेत. दोन हातात न मावणारे हे मोठे आंबे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. त्यामुळे त्यांच्या शेतातील झाडाला लागलेले एक फूट लांबीचे आंबे पाहण्यासाठी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.

पाण्याचे योग्य नियोजन, झाडांची शास्त्रीय दृष्टिकोनातून घेतलेली काळजी आणि निसर्गातील विविध घटकांची योग्य साथ लाभल्यास, असे विक्रमी उत्पन्न सहज पदरात पडू शकते, अशी प्रतिक्रिया अंगुले यांनी दिली आहे. त्यांच्या बागेतून एकरी पाच लाखापर्यंतचे उत्पन्न यंदा मिळू शकेल असा त्यांचा अंदाज आहे.

चार किलो वजनाच्या केशर आंब्यामुळे पंचक्रोशीत प्रसिद्धी मिळालेल्या अंगुले यांच्या आंब्याला यंदा बाजारात चांगली मागणी येणार हे मात्र नक्की आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य