Sunday, 20 January 2019

अहमदनगरमधील दुहेरी हत्याकांड प्रकरणी मुख्य सूत्रधार अटकेत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार नगरसेवक विशाल कोतकर यांना अटक करण्यात आलीय. पोलिसांकडून राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित नगरसेवक विशाल कोतकर यांची चौकशी सुरु आहे. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे शनिवारी सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले होते.

दरम्यान नवनिर्वाचित नगरसेवक विशाल कोतकरला पोलिसांनी 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला प्रकरणातील भाजपचे आ. शिवाजी कर्डिले यांना अखेर आज सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय. आ.कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालाय.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य