Tuesday, 20 November 2018

मराठावड्यात फिरते पोलीस ठाणे कार्यान्वित

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली

महिला,वृद्ध नागरिक,दुर्गम भागातील नागरिकांना पोलीस ठाण्यात तक्रार देणे कठीण असते. मात्र नागरिकांची हीच अडचण दूर करण्यासाठी हिंगोली पोलिसांनी. मराठावड्यातील पहिले फिरते पोलीस ठाणे हिंगोलीमध्ये कार्यान्वित केल आहे.

पोलीसांना बघितलं कि सर्व सामान्यांच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण होते. मग पोलिसांची मोठी व्हेन जर बघितली कि दंगल घडली किंवा गावातील नागरिकांना अटक करण्यासाठी व्हेन चा वापर होतो असा समाज एक आहे . पण आपल्याला दिसणारी हि व्हेन नागरिकांना भीती वाटण्यासाठी नाही तर त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पाठवण्यात आली आहे .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यात फिरते पोलीस ठाणे कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते.मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून मराठवाड्यातील पहिले फिरते पोलीस ठाणे हिंगोली जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आले .

पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्या पुढाकारातुन पोलिसांनी फिरते पोलीस ठाणे कार्यान्वित केले आहे .चिरंजीव प्रसाद यांनी हिरवी झेंडी दाखवून या फिरत्या पोलीस ठाण्याचे उदघाटन केले .प्रसाद यांनी हिंगोली पोलिसांचे कौतुक देखील केले .

 hingoli-police.png

loading...

Top 10 News

राशी भविष्य