Wednesday, 12 December 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून औरंगाबादकरांना तात्पुरता दिलासा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा काढण्यात आला आहे. खदान परिसरात कचरा टाकण्यास तात्पुरता आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी खदान परिसरात कचरा टाकण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली.

“औरंगाबाद येथील खदान परिसरात तात्पुरती कचरा टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले आहे. पोलिसांनाही संयमाने प्रकरण हाताळण्यासाठी सांगितले आहे.”,अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर सांगितले. तसेच, "उद्या औरंगाबाद कचरा प्रश्न मार्गी लागेल. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे", असेही आदित्य ठाकरेंनी सांगितले.

दरम्यान, उद्या महापालिका आयुक्त आणि शिवसेनेचे खासदार-आमदार भूखंड पाहणी करणार आहेत. गेल्या 19-20 दिवसांपासून सुरु असलेल्या औरंगाबादेतील कचरा प्रश्नाने अगदी शेवटचे टोक गाठले होत. कचरा टाकण्यासाठी आलेल्या काही गाड्यांची तोडफोड केली होती एवढच नाही तर त्या पेटवून दिल्या होत्या. यावेळी आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. परिणामी संतप्त झालेल्या स्थानिकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत 3 अधिकारी आणि 9 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यात 5 ते 6 खासगी गाड्याही ग्रामस्थांनी फोडल्यात तर मोठ्या प्रमाणात दुकाणांचही नुकसान झालं आहे ते वेगळच.

loading...

Top 10 News

राशी भविष्य