Tuesday, 22 January 2019

औरंगाबादचा प्रवास उलट्या दिशेने, कुंडीत कचरा टाकल्यास 500 रुपये दंड

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा रस्त्यावर टाकू नकाकचराकुंडीत टाका. असे संदेश आपण सगळ्याच शहरात पाहतो. मात्र औरंगाबाद शहराचा प्रवास उलट्या दिशेने सुरू असल्याचं आता समोर आलंय. कुंडीत कचरा टाकल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल असे आदेश फलक कचराकुंडीवर लावून शहरातील नागरिकांच्या संतापात भर टाकलीय.

शहरातील सिडको एन-2 क्रिकेट ग्राउंड परिसरातील कचराकुंडीवरच हा बोर्ड लावण्यात आला आहे. बोर्ड लावण्याबरोबरच कोणी कचरा टाकू नये म्हणून पालिकेकडून कचराकुंडीला पहारेकरी ठेवण्यात आलेत. गेल्या 13 दिवसांपासून औरंगाबाद शहरातील कचरा उचलला नसल्याने कचरा कुंड्या काठोकाठ भरल्या आहेत. रस्त्यावर कचऱ्याचे डोंगर चढल्याने दुर्गंधी पसरलीय. त्यामुळे पालिकेकडून अनेक ठिकाणच्या कचराकुंडीमध्ये कचरा टाकण्यास मनाई केली आहे. त्यासाठी कुंडीवर आर्थिक दंडाची सूचना लावली आहे. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास पालिका अपयशी ठरत आहे. कचऱ्यासारखा प्रश्न सोडवला जात नसल्याने औरंगाबाद महापालिकेचा प्रवास उलट्या दिशेने सुरु असल्याचं आता बोललं जातंय.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य