Friday, 18 January 2019

...म्हणून ‘तिने’ जिल्हाधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली

सावकारानं शेत जमीन बळकावल्यानं हिंगोलीत एका शेतकरी महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय.

निवासी उप-जिल्हाधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून या शेतकरी महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय.

कौशल्याबाई उबाळे असं या शेतकरी महिलेचं नाव आहे. वेळेतच पोलिसांनी महिलेला अडवल्यानं मोठा अनर्थ होता-होता टळला.

कौशल्याबाईंनी स्वत:ची 2 एकर जमीन गावच्या सावकाराकडे गहाण ठेवली होती. परंतु, व्याजासकट पैसे देऊनही सावकार जमीन परत करत नाहीये, हे लक्षात येताच कौशल्याबाईंनी पोलिसांत तक्रार केली.

पण, तक्रार करूनही पोलीस काही कारवाई करत नसल्यानं. या महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य