Tuesday, 20 November 2018

हिंगोलीत जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे फाईलींचे एक दोन नव्हे तर 30 गठ्ठे गेले चोरीला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली

हिंगोलीत जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे महत्वाच्या फाईलचे 30 गठ्ठे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेतील अर्थ आणि बांधकाम विभागातील महत्वाच्या फाईलचे 30 गठ्ठे चोरीला गेलेत. यामुळे जिल्हा परिषदमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विषेश म्हणजे यातील एक फाईलचा गठ्ठा चोरून नेतांना ऑटो रिक्षातून जिल्हाधिकारी कार्यालयच्या कंपाउंड वॉलजवळ एक गठ्ठा खाली पडला. त्यानंतर चोरी झाली असल्याचं समजले. चोरीची ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. या सीसीटीव्हीच्या आधारे हिंगोली शहर पोलिसांत अर्थ विभागाचे बापूराव काळदाते यांच्या फिर्यादीवरून तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य