Wednesday, 12 December 2018

बीडमध्ये जन्माला आले दोन तोंडाचे बाळ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

बीडच्या एका महिलेने एक शरीर आणि दोन तोंड असलेल्या बाळाला जन्म दिला. अंबाजोगाईमधील स्वाराती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महिलेची रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास प्रसुती झाली.

बाळ आणि बाळंतीण सुखरुप आहेत. प्रसुती विभागातील सर्जन डॉ. संजय बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघड शस्त्रक्रियेद्वारे महिलेची प्रसुती केली. बाळाच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी त्याला शिशू अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलंय.

महिलेची आधीची कागदपत्रं तपासताना बाळामध्ये दोष असल्याचं लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी सिझेरियनद्वारे प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. मात्र बाळाला बाहेर काढल्यानंतर त्याला दोन तोंड असल्याचं त्यांना दिसलं. महत्त्वाचं म्हणजे बाळाचं वजन 3 किलो 700 ग्रॅम असून त्याची आणि आईची प्रकृती चांगलीय. एका बाळाची संपूर्ण वाढ झाली आहे, तर दुसऱ्या बाळाचं तोंड, छाती आणि पोटाकडचा भाग पहिल्या बाळाला जोडला गेलाय. या बाळाला दोन डोकं, दोन किडनी आणि दोन फुफ्फुस आहेत. मात्र इतर अवयव एकच आहेत. दरम्यान महिलेचं हे पाचवं अपत्य आहे. याआधी तिला तीन मुली आणि एक मुलगा आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य