Wednesday, 23 January 2019

बीड जिल्हा परिषदेत भाजप आघाडीला जबरदस्त धक्का

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

बीड जिल्हा परिषदेत भाजप आघाडीला जबरदस्त धक्का बसलाय. सत्ता स्थापनेत पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा बंडखोर सदस्य पक्षानंतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरलेत.

यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा परिषदेच्या राजकारणात खळबळ माजलीय. या सहा सदस्यांत माजी मंत्री सुरेश धस यांच्या गटाचे 5 तर जयदत्त क्षीरसागर गटाच्या एका सदस्याचा समावेश आहे.

जि.प. अध्यक्षपदासाठी भाजपच्या सविता विजय गोल्हार यांनी मंगला प्रकाश सोळंके यांचा, तर उपाध्यक्षपदासाठी शिवसंग्रामच्या जयश्री राजेंद्र मस्के यांनी शिवकन्या शिवाजीराव सिरसाट यांचा पराभव केला होता.

या निकालाविरुद्ध पक्षांतर विरोधी कायद्याचा भंग केला म्हणून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे, पराभूत उमेदवार मंगला सोळंके आणि अजय मुंडे यांनी या सहा जणांविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करीत या सर्वांना अपात्र घोषित करावे, अशी याचिका दाखल केली होती.

अखेर सुनावणीनंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी 16 आॅक्टोबर रोजी ही याचिका निकाली काढीत या सर्वांना अपात्र ठरविले आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य