Wednesday, 21 November 2018

तुकाराम मुढेंच्या समर्थनार्थ आंदोलन...

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सत्ताधारी भाजपकडून अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार असताना सामान्य नाशिककर मात्र मुंढेंच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. येत्या शनिवारी मुंढे यांच्या विरोधात सत्ताधारी भाजपकडून अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. याच दिवशी नागरिक मुंढे यांचा समर्थनार्थ  'वॉक फ़ॉर कमिशनर'  या उपक्रमाअंतर्गत रस्त्यावर उतरणार आहेत.  

सोशल मी़डियाच्या माध्यमातून 'आम्ही नाशिककर' या नावाने लवकरच जनआंदोलन छेडण्यात येणार असून ज्या दिवशी महापौरांकडून अविश्वास ठराव मांडण्यासाठी महासभा बोलविण्यात येणार आहे. यासाठी 'WeSupportMundhe' नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला असून त्यावर चर्चा करत शासकीय विश्रामगृहात या सगळ्या सदस्यांची बैठक झाली.ज्यामध्ये सर्वसामान्य नाशिककरांसह महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुंढेंसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना आम्ही काही केल्या नाशिकमधून जाऊ देणार नाही आणि भाजपचा हा डाव आम्ही हाणून पाडू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. ट्वीटरवर #wesupportmundhe, #nashikformundhe, #nashiksupportmundhe असा ट्रेंड चालवण्यात येत आहे.

नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे बॅकफूटवर

नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंचा दबदबा, प्रशासकीय कामकाजाला शिस्त लावण्यासाठी मुंढेचे कठोर निर्णय

अधिकारी आणि कर्मचा-यांनंतर तुकाराम मुंढेंचा देवी देवतांना दणका; महापालिकेतून देवांचे फोटो हटवण्याचे आदेश

loading...

Top 10 News

राशी भविष्य