Thursday, 17 January 2019

साखरेच्या गरम पाकात पडून चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकमध्ये 3 वर्षीय चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. स्वरा शिरोडे असं मृत चिमुरडीचं नाव असून, साखरेच्या गरम पाकात पडून तिचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये राहणाऱ्या शिरोडे कुटुंबीयांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. त्यांना गुलाबजाम बनविण्याची ऑर्डर मिळाली होती.

त्यासाठी त्यांनी मोठ्या पातेल्यात साखरेचा पाक बनवायला ठेवला होता, दरम्यान स्वरा खेळता-खेळता घरातील स्वयंपाक घरात पोहचली आणि गुलाबजामसाठी तयार केलेल्या गरम पाकात पडली.

त्यानंतर स्वराला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान स्वराचा दुर्देवी मृत्यू झाला, परंतु संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे स्वराचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. स्वराच्या मृत्यूप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य