Sunday, 20 January 2019

नाशिक जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत,डॉक्टरच शोधतायत खड्यांमध्ये भविष्य

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

अंधश्रद्धा रोखण्यासाठी एकीकडे शासकीय पातळीवर कसोशीने प्रयत्न केले जात असतानाच दुसरीकडे मात्र डॉक्टरांच्या उपस्थितीतच "राशींच्या खड्यां'चा बाजार भरल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात घडलाय. ज्या बोटांनी डॉक्टर रुग्णांची नाडी अन् हृदयाचे ठोके मोजतात, त्याच डॉक्टरांची बोटे रस्त्यावर खडे विकणाऱ्याच्या हातात स्थिरावल्याची पाहून समाजात अंधश्रद्धा किती खोलवर रूजलीये, हे यातून प्रकर्षाने दिसून आलंय.

जिल्हा रुग्णालयाच्या तात्काळ कक्षात वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश खेरकर हे प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांसमवेत बसले असताना त्यांनी खडे विकणासाठी आलेल्या दोन बिहारी तरुणांकडून स्वतःसाठी कोणता खडा राशीला धार्जिण आहे याची माहिती करून घेतली. त्या बिहारी तरुणांनी त्यांच्या हातावर वाटी फिरवत तुमच्यासाठी पुष्कराज खडा धार्जिण असल्याचं त्यांना सांगितलं. हा प्रकार सुरू असताना उपस्थित रुग्णांनी मात्र आश्चर्य व्यक्त केलं. दरम्यान, हा प्रकार चुकीचा असल्याचं सांगत याची चौकशी केली जाईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.

एकूणच या प्रकरणावरून रुग्णांना जीवदान देणारे, देवदूत म्हणणारे डॉक्टरच आपलं भविष्य खड्यांमध्ये शोधत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या तात्काळ कक्षात प्रशिक्षणार्थी असलेल्या भावी डॉक्टरांसमोरच राशींच्या खड्यांचा बाजार भरलेला पाहून,इथले रुग्ण आणि त्यांच्या नातलगांच्या मात्र भुवयाच उंचावल्या.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य