Sunday, 18 November 2018

‘देव त्यांना सुबुध्दी देवो’ ; मुनगंटीवारांनी भाजपच्याच जेष्ठ नेत्यावर साधला निशाणा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल उंदीर घोटाळ्यावर भाष्य करत सरकारची अडचण केली होती. त्यावर सुधीर मुनगंटीवारांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘प्रत्येक गोळी खाऊन उंदीर मेला असा अर्थ काढणं चुकीचं आहे,देव असा अर्थ काढणाऱ्यांना सुबुध्दी देवो’, असं म्हणत त्यांनी खडसेंना नाव न घेता टोला लगावला.

मुनगंटीवारांनी खडसेंवर केलेल्या या खरमरीत टीकेला खडसे काय उत्तर देतायत, हे पहावं  लागेल.

 

काय आहे उंदीर घोटाळ्याचा खडसेंचा आरोप ?

मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाल्याने आधी उंदरांची संख्या मोजण्यात आली. ती संख्या चक्क 3 लाख 19 हजार 400 एवढी दाखवण्यात आली. आणि पुढे या उंदरांचा बंदोबस्त करण्याचा निश्चयच सरकारने केला. यासाठी दोन महिन्यांच्या मुदतीवर एका कंत्राटदारास हे काम देण्यात आले. प्रत्यक्षात या कंत्राटदाराने ही मोहीम अवघ्या 7 दिवसांतच फत्ते केली. या उंदरांची विल्हेवाट कशी लावली? याचं उत्तर सरकारकडे नाहीये. ज्या संस्थेला कंत्राट दिलं गेलं त्यांनी विष बाळगण्याची परवानगी घेतलीच नव्हती, असा आरोपही खडसेंनी काल आपल्या विधानसभेतील भाषणात केला होता.

या संपूर्ण कंत्राटावर प्रश्न उपस्थित करतानाच, एवढा खटाटोप करण्यापेक्षा दहा मांजरी सोडल्या असत्या तर उंदरांचा प्रश्न मिटला असता असा मिश्किल टोलाही खडसेंनी यावेळी मारला होता.

loading...

Top 10 News

राशी भविष्य