Thursday, 17 January 2019

''ते' आहेत बीजेपीचं खणखणीत नाणं, नारायण राणेंना बाकी आहे काही तरी देणं'- रामदास आठवले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

शुक्रवारी दुपारी दोन वाजता रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये सभा घेतला होती. त्या दरम्यान, रामदास आठवले यांनी अनेक विषयांवर चर्चा केल्या. त्या दरम्यान, संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांची चौकशी सुरू आहे. यामध्ये कोणावरही अन्याय व्हावा अशी भूमिका आमची नाही. जर का त्यांचा यात हात असेल,तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई होण आवश्यक आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणाला आधीच एक दीड महीना होत आला आहे, अजून विलंब न करता पोलीसांनी लवकरात लवकर तपास लावावा असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या नव्या व्हिडीओ बाबत जेव्हा रामदास आठवले यांना विचारण्यात आसं असता, मी अजून ही तो व्हिडीओ पाहीलेला नाही आणि गाण ऐकलेल नाही. असं त्यांनी यावेळी म्हटलं. त्याच विषय नारायण राणेंचा संदर्भ जोडत त्यांनी एक काव्य देखील तयार केल. 'ते आहेत बीजेपीचं खणखणीत नाण, नारायण राणेंना काही तरी आहे बाकी देणं'.

नारायण राणेंच्या पक्षात आगमना विषयी नारायण राणेंच सुटत नसेल कोडं, तर कुठे तरी अडकतयं घोड आशा त्यांच्या काव्यांने सर्वत्र हशा पिकला. तसंच नारायण राणेंना मंत्री पद दिलं आणि शिवसेनेचा पाठींबा जर त्यातून निघाला तर अडचणी निर्माण होण्याच्या शक्यता आहेत. असं ते यावेळी बोलले.

दलीत-मराठा वादावर भाष्यकरताना, देशात आता सर्व मंदिरात दलितांना प्रवेश मिळाला पाहीजे तसेच दलीत-मराठा वाद महाराष्ट्राला परवडणारा नाही. दोघांनी एकत्र आलं पाहीजे. ही आमची भूमिका आहे असं त्यांनी या वेळी म्हटलं.

मराठा समाजाला आरक्षण द्याव ही आमची भूमिका आहे. राजकीय फायद्यासाठी दलीत-मराठा वाद पसरवला जातोय, प्रकाश आंबेडकर हे आमचे नेते आहेत आणि भीमा-कोरेगाव दलितांवरील गुन्हे सरकार काढणार असं त्यांनी या वेळी म्हटलं.

मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक राज्यात भाजप-सेना यांनी एकत्र निवडणूक लढवावी. आपापसात जागा वाटप योग्य पद्धतीने करावं. सेनेनं भाजपला सोडलं तरी RPI भाजपसोबतचं असणार आहे. नारायण राणेंनी राज्यसभा ऑफर असेल तर स्वीकारावी, राणे राज्यात नाहीतर केंद्रात मंत्री होतील असं त्यांनी या वेळी म्हटलं. राणेंना भाजपचा प्रस्ताव मान्य नसेल तर त्यांनी RPI मध्ये यावं असं ते यावेळी बोलले.

विरोधी पक्षावर कडाडून टिका करत काँग्रेस आणी राष्ट्रवादी सत्तेत नसल्यानं ते तडफडत आहेत अशी बोचरी टिका त्यांनी केली. भाजपनं कितीही सेक्युलर भूमिका घेतली तरी काँग्रेस आणी राष्ट्रवादी यांना काही ती पटत नाही असं ते बोलले.
जातीयवादाला काँग्रेस जबाबदार आहे. भाजप जातीयवादी आहे हा आरोप खोटा पूर्णपणे खोटा आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

loading...

Top 10 News

राशी भविष्य