Tuesday, 22 January 2019

जीर्ण जलकुंभ जमीनदोस्त करताना अखेर पोलीस सुरक्षा व्यवस्थेला यश

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

जीर्ण झालेलं जलकुंभ पाडण्यासाठी आज कडेकोट पोलीस सुरक्षा व्यवस्थेत कामकाज करण्यात आले. मात्र साकाळी 6 वाजता म्हणजेच तब्बल 12  तासांनी जीर्ण जलकुंभ कोसळला. जस जशी जलकुंभाची बुरुज ढासळत होती तशी बघ्यांच्या काळजाची ठोकी वाढत होती. शेजारी असलेल्या व्यापारी संकुलावर जलकुंभ पडण्याची शक्यता असल्याने यंत्रणेकडून विशेष काळजी घेतली जात होती.

8 फेब्रुवारी रोजी नागद रोडवरील जलकुंभ पाडले जाणार असल्याने व्यापारी संकुल व परिसरातील दुकाने पुर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. कुठलीही हानी होवू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी 6 वाजल्यापासून जलकुंभ पाडण्याच्या कामाला ठेकेदार मुन्ना बेग अहमद बेग,शेख सलाउद्दीन ,शेख शकुर शेख अब्दुल्ला ,शहादत शहा,अहमद शहा,सैय्यद समद, गुलाब शहा बशीर शहा, अहमदभाई नाशिकवाले यांनी कामाला सुरूवात केली.

सायंकाळी उशिरापर्यंत 3 कॉलम पाडून झाली. मात्र उर्वरीत 6 कॉलमवर जलकुंभ जैसे थे उभा होता. गेल्या अनेक दिवसापासून हे जलकुंभ जीर्ण झाल्याने पाडण्याबाबतचे निर्देश नगरपालिकेने दिले होते.

कर्मचारी अभियंत्यांच्या उपस्थित पोलीस निरीक्षक रामेश्‍वर गाडे पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र रसेडे, वाहतुक शाखेचे सुरेश शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक संजय पंजे देखील या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात होती. तब्बल 12 तासाच्या अथक परिश्रमानंतर सायंकाळी 6 वाजता जलकुंभ जमीनदोस्त झालं विशेष म्हणजे पथकाने अतिशय नियोजन बद्द पद्धत्तीन आपलं काम केल त्यामुळं कुठलीही हानी झाली नाही.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य