Thursday, 17 January 2019

...अन् खेळता खेळता 10 रूपयाच्या कॉईनने घेतला ‘तिचा’ जीव

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

तुमच्या घरात लहान मुलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आई वडिलांचं थोडस झालेलं दुर्लक्ष एखाद्या बाळाच्या कसं जीवावर बेतू शकत याचा प्रत्यय नाशिकच्या या घटनेनं आला आहे. दहा रुपयांचा कॉईन गिळल्यानं नाशिकमधल्या एका साडेचार वर्षांच्या चिमुरडीनं आपला जीव गमावला आहे. शालिनी हांडगे असं या मुलीचं नाव असून या घटनेमुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय.

रडत असलेल्या साडेचार वर्षांच्या शालिनीला शांत व्हावं म्हणून तिच्या आईनं दहा रुपयांचा कॉईन खेळायाला दिला. मात्र आईची पाठ वळताच शालिनीन खेळता खेळता हा कॉईन गिळला आणि तोचं तिच्या घशात अडकला. 

जो कॉईन शालिनीन गिळला तो उभाच तिच्या घशात अडकला. खूप प्रयत्न करू देखील कॉईन निघत नाही हे बघून तिच्या पालकांनी तिला नाशिकच्या आडगाव मेडिकल हॉस्पिटलला नेलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तरी वेळेवर उपचार झाले असते तर तिचा जीव वाचलं असता असं तद्न्यांच मत आहे.

साडेचार वर्षांची शालिनी नुकतीच बालवाडीत जाऊ लागली. घरातली हालाखीची परिस्थिती असून देखील शालिनीला शिकवून मोठं करण्याचं तिच्या आई वडिलांचं स्वप्न होत. मात्र एका क्षणात होत्याच नव्हतं झालं. शालिनीवर वेळेवर उपचार न झाल्याची खंत आयुष्यभर बोचेल असं तिच्या वडिलांनी सांगत आपल्या अश्रुना वाट करून दिली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य