Saturday, 17 November 2018

...म्हणून कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपींच्या वकिलांनी केलेय नराधमांना कमीत कमी शिक्षा व्हावी अशी मागणी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणी तिन्ही दोषींच्या शिक्षेचं काऊंटडाऊन सुरू झालंय. दोषींच्या शिक्षेवर अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला.

मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येप्रकरणी दोषी आहेत.

दोषींच्या वकिलांनी आपल्या अशिलाला कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केलीये.

आरोपींच्या वकिलांनी नेमका काय युक्तीवाद केलाय कोर्टात

अॅड. योहान मकासरे (दोषी जितेंद्र शिंदेचे वकील)

Kopardi_02_WEB.jpg

"मी सरकारकडूनही आरोपी नंबर एकचं काम पाहतोय आणि फाशी न देता जन्मठेप द्यावी, अशी विनंती केली आहे"

"आरोपी म्हणत होता, मी मारलं नाही. फाशी की जन्मठेप, हे सांगायचं होतं. आम्ही जन्मठेपेची मागणी केली आहे"

 

अॅड. बाळासाहेब खोपडे (दोषी संतोष भवाळचे वकील)

Kopardi_03_WEB.jpg

"घटना दुर्देवी आहे, मात्र प्रत्येकाला बचावाचा, अधिकार आहे. त्यामुळे शिक्षेच्या सुनावणीवर कोणताही सामाजिक दबाव नसावा"

"संतोष भवाळनं गुन्हा केलेला नाही, तरीही पुरावा आणून आरोपी दोषी ठरवला गेला"

"घटनेवेळी 2 आणि 3 क्रमांकाच्या आरोपींना कुणीही घटनास्थळावरून पळून जाताना पाहिलेलं नाही. म्हणून संतोष भवाळवर 302 कलमाची शिक्षा लागू होत नाही"

"या प्रकरणी रेअरेस्ट ऑफ रेअर असं यात काय घडलं? दिसला फिरला म्हणून कट करून हत्या असं होत नाही"

"शिक्षा दिली तर समाजात एकोपा होईल का, तसं असेल तर मी फाशी मागेन. फाशीसाठी पुरावा नाही"

 

अॅड. प्रकाश आहेर (नितीन भैलुमेचे वकील)

Kopardi_01_WEB.jpg

"120-ब म्हणजे कटकारस्थान आणि 109  म्हणजे गुन्ह्याला उत्तेजित करणं, या दोन कलमांखाली आरोपी तीनला दोषी ठरवण्यात आले आहे"

"जे काही कोर्टासमोर आलेले आहेत, त्यामध्ये आरोपी क्रमांक तीन याच्याविरोधात कुठलाही साक्षीदार नाही किंवा प्रत्यक्षदर्शी नाही"

"संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारलेला आहे"

"नितीन भैलुमे कॉलेजचा विद्यार्थी असून, बीएससीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेतो आहे आणि त्याचे आई वडील गरीब आहेत"

"दलित कुटुंबातून येऊन इतकं शिक्षण घेतलं. नितीनच्या पुढील अभ्यासासाठी न्यायालयाने जेलमध्ये पुस्तकेही पुरवली होती"

"त्याची आई आजारी असते. तिचं ऑपरेशन झालेलं आहे. वडील मजुरी करतात"

"या गुन्ह्यात अडकवल्यामुळे आणि त्याला 120 ब आणि 109 मध्ये दोषी असून,  302 म्हणजे गुन्ह्यामध्ये कुठलाही संबंध नाही, बलात्कारामध्ये त्याचा कुठलाही संबंध नाही"

"त्याच्याविरोधात कुठलाही मेडिकल पुरावा नाही. दाताच्या सॅम्पलमध्येही त्याच्याविरोधात रिपोर्ट आलेले नाहीत"

loading...

Top 10 News

राशी भविष्य